Marathi Suvichar वाचून तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाला प्रेरणादायी बनवू शकता. आजच्या लेखामध्ये आपण मराठी सुविचार पाहणार आहोत. हा मराठी सुविचार रोज वाचून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता.
“आयुष्यात आपल्याला काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता असते, पहिली गोष्ट म्हणजे ‘संकल्प’ आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारा ‘संघर्ष’. त्यासाठीच आम्ही आजच्या लेखामध्ये बेस्ट मराठी सुविचार घेऊन आलो आहोत..आम्हाला खात्री आहे की तुम्हाला हे Marathi Suvichar नक्की आवडेल. संघर्ष केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही. कधी कधी संघर्ष करताना माणूस हतबल होतो..निराश होतो पण मेहनत करावी लागते.
Marathi Suvichar तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देऊ शकेल. तसेच आम्ही तुमच्यासाठी मोटिवेशनल स्टेटस कलेक्शन तो नक्की वाचा.
Best Motivational marathi Suvichar सांगणार आहोत, जे त्यांच्या कठीण परिस्थितीत आपले सामर्थ्य निर्माण करून पुढे जाण्याची प्रेरणा देतील. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी सुविचार संग्रह..
चला तर पाहूया..
Marathi Suvichar – मराठी सुविचार
“कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही
तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.”
“परमेश्वराकडून मनासारख नाही मिळाल तर नाराज होऊ नका, कारण
तो अस कधीच देणार नाही जे तुम्हांला चांगलं दिसत..
पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असत.”
“आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका,
कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात!”
“आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु
आपल्या सवयी बदलू शकतो
आणि नक्कीच आपल्या सवयी
आपलं भविष्य बदलेल !”
“जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि
जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा,
चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे..
“जे लोक हटके विचार करतात तेच लोक
इतिहास रचतात, आणि हुशार लोक ही त्यांनाच फॉलो करतात!”
क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..
“खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो..
लक्षात ठेवा.”
“पैशाने खूप गरीब आहे मी, पण माझा एक स्वभाव आहे,
जिथे माझ चूकत नाही, तीथे मी कधी झूकत नाही.”
“तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगती होत आहे.”
“रात्रभर गाढ झोप लागणं याला सुध्दा नशिबच लागतं,
पण हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं !!” 😄😄
“जिवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो.”
‘वेळ चांगली असो किंवा वाईट,
शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत
साथ देणं ह्यालाच माणुसकी म्हणतात.’
‘सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडून उसने मिळत नाही, तर
ते स्वत:च निर्माण करावे लागते.’
“खोटं सहज विकलं जातं, कारण
सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते.”
“एक सुंदर वाक्य शरीर जितकं फिरतं राहील
तेवढं स्वस्थ राहतं आणिमन जितकं स्थिर राहीलतेवढं शांत राहतं. ”
“रात्रभर गाढ झोप लागणं याला सुध्दा नशिबच लागतं,
पण हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं !!” 😄😄
कोणालाही तुमच्या ह्या चार गोष्टी कधीही सांगू नका :-
तुमचा पुढचा प्लॅन, तुमचा बँक balance, तुमची लव्ह लाईफ
तुमचे दुःख
“आयुष्य जगून समजते.. केवळ ऐकून,
वाचून,बघून समजत नाही.”

‘आयुष्य थोडच असाव,
पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं.’
“आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार? सगळे इथेच सोडून जायचे आहे.”
“बिरबल बुद्धीवान होता तरीही तो
राजा होऊ शकला नाही.!”
“ज्या दिवशी माणूस समजेल कि समोरचा चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्या पेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी अनेक वाद संपतील.”
“वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असते मग ती कशीही असो, कारणकोळसा पेटलेला असतो, तेव्हा हात भाजतो,आणिपेटलेला नसतो.. तेव्हा हात काळे करतो !!!”
“दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू
शकत नाही, जोपर्यंत आपण
हरण्याचा विचार करत नाही”.
“मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं.”
“दगडात एक कमतरता आहे,
की तो कधी वितळू नाही शकत,
पण एक चांगलेपणा आहे
की तो कधी बदलत नाही.”
“गरुडासारखे उंच ‘उडायचे’ असेल तर
कावळ्यांची संगत सोडावी लागते.”
“पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा
मळलेल्या कपड्यातील
इमानदारीचा रंग रुबाबदार असतो”
“जिवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो.”
‘वेळ चांगली असो किंवा वाईट,
शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत
साथ देणं ह्यालाच माणुसकी म्हणतात.’
‘सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडून उसने मिळत नाही, तर
ते स्वत:च निर्माण करावे लागते.’
“खोटं सहज विकलं जातं, कारण
सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते.”
“एक सुंदर वाक्य शरीर जितकं फिरतं राहील
तेवढं स्वस्थ राहतं आणिमन जितकं स्थिर राहीलतेवढं शांत राहतं. ”
marathi suvichar images
“तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ 99% हरलात असा भ्रम काढून टाका,
कारण एक प्यादा सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकतो..
फक्त धाडस सोडू नका.”
“कष्ट हा उंबरठ्याचा दिवा आहे,
त्यांने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतो.”
“समाधान ही अंत:करनाची सर्वात सुंदर संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.”
“आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही,
सुविचार पण असावे लागतात, आपण कसे दिसतो.
ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.”
“गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही,
अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.”
“केवड्याला फळ येत नाही पण
त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.”🌺🌼
“तुम्ही सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.”
“बचत म्हणजे काय आणि ती
कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं”.
“कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी ‘उपयोगी’ पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.”
“प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात
त्यांच्याशीही प्रेमानेच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही स्वतः चांगले आहात म्हणून”
“न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न
करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.”
“माणसाने ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही,
स्वतःवर विश्वास असला ना की
आयुष्यात कुठून हि सुरूवात करता येते.”
“आयुष्यात काहीही नसले
तरी चालेल
पण तुमच्यासारख्या प्रेमळ
माणसांची साथ आयुष्यभर राहू द्या.”
“सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,
वेळ वाया जाईल…
“स्वातंत्र्य म्हणजे संयम….. स्वैराचार नव्हे.”
“एकदा निघून गेलेली वेळ
पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.”
“उद्याचं काम आज करा आणि
आजचं काम आत्ताच करा.”
“यश मिळवायचं असेल तर स्वत:च
स्वत:वर काही बंधन घाला.”
“दररोज कमीत कमी 8 तास तुमच्या कामासाठी द्या.
मग ते काम असो वा अभ्यास. पण 8 तास त्यासाठी वेगळे ठेवा.”
Life suvichar marathi
“शिस्त लावून घ्या..भरपूर मेहनत करा,
आयुष्यात संघर्ष महत्त्वाचा आहे.”
इंटरनेट, मोबाइलवर शिकण्यासारखं पाहा,
व ते एकदा ट्राय करून पाहा.”
“नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.”
“छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच ‘आत्मविश्वास’ “यशस्वी” होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो.”
“कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत बसत नाही.”
“तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही
पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.”
“व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही.
कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो”.
“विचार असे मांडा कि तुमच्या
‘विचारांवर’ कुणीतरी विचार केलाच पाहिजे.”
“आयुष्य सरळ आणि साधं आहे
ओझं आहे ते फक्त
अपेक्षा आणि गरजांचं..”
“माणूस जोडा..माणूस जपा..
कर्म करा..पण कधी फळाची चिंता
करू नका.”
“संघर्ष करा, मेहनत करा..
एक दिवशी तुम्हाला यश नक्की मिळेल.”
“रोज सकाळी नवीन ऊर्जेने काम करा,
कामात अधिक लक्ष लागेल.”
‘भले ‘यशस्वी’ होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची “प्रेरणा” नक्कीच
असली पाहिजे.’
“लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे”..
जी माणसं
“दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
‘आनंद’ निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
‘ईश्वर’ त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही…
“तुमचं आयुष्य घडवायचं कि वाईट संगतीनं बिघडवायचं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे.”
“आळशीपणा मधे थोडा सोशल Distancing ठेवा..
आणि मेहनती चे Vaccine घ्या.”
“लाईफ तुमची आहे..
संघर्ष तुम्हालाच करायचा आहे..
बाकीचे फक्त माझा बघणार..पण
तुम्ही मात्र आपल्याला कामाशी काम ठेवा.”
“फक्त पंख असून उपयोग नाही,
खरी आकाशातील उंच भरारी त्या पंखात असणाऱ्या आत्मविश्वासात असते”.
“सैनिक आणि परमेश्वर आपल्याला
फक्त संकट काळातच आठवतो.”
“दररोज अर्धा तास मेडिटेशन करा.
जेणे करून तुमचे लक्ष केंद्रीत व्हायला अधिक मदत होईल.”
‘आरसा’ आणि ‘हृदय’
दोन्ही तसे नाजूक असतात….
फरक एवढाच आहे की,
आरशात सगळे दिसतात,
आणि “हृदयात” फक्त आपलेच
दिसतात….
“चांगली वेळ बघायची
असेल तर, वाईट वेळेला
हरवावच लागत”.
“आपला चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा,
तुम्हाला कधीच सावली दिसणार नाही.”
“कधीही शांत लोकांच्या नादी लागू नका,
कारण ते वादळासारखे असतात.”
“नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.”
“आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही..
कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.”
“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!
कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही”.
“इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या
विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा.”
“जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल
तर तो तुमचा problem आहे माझा नाही.”
“नेहमी सकरात्मक विचार करा.कारण
त्याने tension कमी येत आणि नवीन उत्साहाने जगता येतं.”
“विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात,
हरवणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात.”
“जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो
त्याच्यामागे धावू नका”.!
“कधीच स्वःताला कमी लेखू नका. कारण ह्या जगात
प्रत्येक व्यक्ती अनोखी आहे.”
“स्वःवर लक्ष केंद्रित करा.
कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भेटतील.
“हे जग अस आहे जिथे मदत तर कुणी करणार नाही,
पण फुकटचे सल्ले द्यायला हजारो येतील.”
“मित्रा मी ना Only One Piece आहे ह्या जगात.”

“वेळ आल्यावर Attitude` दाखवण पण गरजेचं आहे..
कारण नेहमी झुकाल तर लोक लायकी दाखवतील.”
“अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे,
एकटं असल तरी सर्वांना पुरून उरायच.”
🤓🤓😎😎
“आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा.
तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही.”
Do iT Today oR Do iT Now..
जे करायचं आहे ते आज करा किव्हा आताच्या आता करा.
“शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत..†
Positive Marathi Suvichar
““जगासाठी कुणीही नसलेली
व्यक्ती आपल्यासाठी विशेष असते..””
“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.
परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे आत्मसात करतात.”
“चांगल्या वेळेपेक्षा ‘चांगली माणसं’ महत्त्वाची असतात
कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते.”
“अपयशाच्या कठीण खडकाखालीच
यशाच्या पाण्याचा झरा असतो.”
“जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा,,
एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.”
“मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.”
“गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.”
“स्वतः चा विकास करा लक्ष्यात ठेवा, गती
आणि जीवनामध्ये करत जाणारे चांगले बदल हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.”
“आपण जे पेरतो तेच उगवते, कायम लक्ष ठेवा.”
“आपण कधीही वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू आपण आपली पतंग निश्चितच नियंत्रित करु शकतो.”
“आपण जन्म घेतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात.
मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक मात्र रडत असतील.”
“आपले यशस्वी हिने हे तर आपल्या
विचारांवरच अवलंबून असते.”
“माणूस एक अजब रसायन आहे,
आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत
आणि नाही आवडला तर त्याचे
चांगले गुण पण दिसत नाहीत.”
“उद्याचा उगवणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो,
त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट करता येतात.”
“उद्याचा भविष्यकाळ वर्तमानात गाळलेल्या
घामामुळेच निर्माण होत असतो”.
“एका वेळी एकच काम करा आणि तेही
एकाग्रतेने करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल.”
“तुमच्या चाली
रचण्याआधीच त्या
जाहीर करू नका.”
“आळशी माणूस
कामाच्या विचारानेही
थकतो..”
“ज्यांच्या कडून काही आशा नाही,
बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!”
“जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते”..
“अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार
म्हणजे
स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत
तुमच्या कानात प्रेमाणे सांगत असतो
सगळं व्यवस्थित होईल.”
*“जेथे मन निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते.”*
““पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.””
*काट्याच्या भीती शिवाय तुम्ही
*गुलाब तोडू शकत नाही.*
जेथे स्वातंत्र्याचा वास असेल तोच माझा देश.
“जे संपले आणि ज्याला इलाज नाही
त्याबद्दल दुखः ही करू नये.”
“रागाच्या भरात माणूस जसे वागतो,
ते शेवटी लाजिरवाणे ठरते.”
“सद्गुणाचे बक्षीस सद्गुण असते.”
*“आपण श्रद्धेवर जगत असतो.””
““भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.””
““लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते.””
“मैत्री असली म्हणजे सर्व ओझी असतात.”
“श्रम संपले म्हणजे आनंद होतोच.”
“जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा,
उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”
“अंधश्रद्धे पेक्षा मौन चांगले.”
“एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे केव्हाही चांगले.”
“चरित्र हाच खरा इतिहास असतो.”
““नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो,
तो त्याच्या मनात नसतो.””
“कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण
होतो,
लक्षावधी हरीण शोधल्यावर
कस्तुरीमृग सापडतो,
हजारो मोती उघडल्यावर
एक मोती सापडतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात
पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.”
“माझी नरकात जायची
सुद्धा तयारी आहे
पण मात्र
त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं..”
“स्वतःची वाट स्वताच बनवा
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”
“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”
“नेहमीच लहान बनून राहा
प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,
आणि इतके मोठे व्हा की
जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसललेे नसेल.”
“आज आराम करून
आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा
शैक्षणिक जीवनात कष्ट करून
आयुष्यभर आरामात जगणं
कधीही चांगलं”👍
एका दिवसाच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल
तर रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला विचारा ,
एक मिनिटाचे महत्व जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन चुकली आहे अशा माणसाला विचारा ,
आणि एका सेकंदाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर जो नुकताच अपघातातून वाचला आहे त्याला विचारा .
सेकंदाच्या दहाव्या भागच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल
तर ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला विचारा.
“विझलो जरी आज मि अंत माझा नाही,
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.”
“जगातील सर्वात सुदंर जोडी
तुम्हाला माहिती आहे का
अश्रू आणि हास्य
कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही
पण ते जेव्हा दिसतात
तो आयुषातला अत्यंत सूंदर क्षण असतो.”
“शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे
माळी असतात,ते बदलून गेले तरी
आठवणींचे फुल आणि मूल त्यांना
जीवन प्रवासात कधीच विसरत नाही”
“आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर
खर्चावर आणि
माहिती जास्त नसेल तर
शब्दावर नियंत्रण पाहिजे.”
“तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
तुमची फसवणूक झाली यात तुमची
काहीही चूक नाही
चूक त्या लोकांनाची आहेत
ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही.”
“आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.”
“मोठा माणूस तोच
जो आपल्या सोबतच्याना
छोटा समजत नाही.”
“भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.”
“भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.”
“चुका आणि अपयश
आणि नकार
हा प्रगतीचा भाग असतो”.
“ज्यांनी स्वप्न पाहिले आहे,
त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे,
मनामधे उस्ताह आहे..
बुद्धि मधे विवेक आहे..
मनामधे करुणा आहे..
ज्याच्या मनगटात ताकत आहे,
ज्याचे मातृभूमि वर प्रेम आहे,
ज्याचे आई-वडीलां वर प्रेम आहे
त्याला कोणीही रोखु शकत नाही”.
“आपल्या प्रतिमेची काळजी घ्या
कारण ते तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे.”
“संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही
आणि प्रामाणिकणा पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.”
“ज्यांना स्वप्न पाहायची असतात
त्यांना रात्र मोठी हवी असते
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात
त्यांना दिवस मोठा हवा असतो.”
“विपरीत परीस्थितीत काही लोक
तुटून जातात
परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून
काढतात.”
“एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा
हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा
हेही समजायला हवे.”
“शांततेच्या काळात जर जास्त
घाम गाळला तर
युद्धाच्या काळात कमी
रक्त सांडावे लागते.”
“अशक्य गोष्ट ती असते..
जी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केलेले नसतात.”
“उपाशी पोटी साधे ‘अन्न’ देखील रुचकर लागते.”
“आपण जिंकू असा विश्वास
असलेलेच विजयी होऊ शकतात.”
पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.
‘आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो.’
“जो निष्पाप असतो,
त्याला सुखाची झोप लागते.”
“जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात,
मात्र ज्यांना यशस्वी व्हायचे असते ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतात.”
“दिवस कितीही मोठा असला तरीही
त्याचा अंत हा होतोच.”
“दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो,
हे नेहमी लक्षात ठेवा.”
“संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही,
जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही
दगडसुद्धा देव होत नाही.”
जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही,
म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.
“जिंकायची मजा तेव्हाच
असते,
जेव्हा अनेक जन तुमच्या
पराभवाची वाट पाहत असतात.”
“टीकाकारांचा नेहमी आदर करा ,कारण
ते तुमच्या गैर हजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात.”
‘शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.’
‘माणुसकी जपा..माणूस व्हा..
मदत करा..आनंद द्या..’
आम्हाला आशा आहे की Best Marathi suvichar या आमच्या आर्टिकल मधील मराठी सुविचार संग्रह तुम्हाला नक्कीच आवडला असेल.. आवडला असेल तर हे Best Marathi suvichar तुमच्या मित्र-मैत्रिणींना WhatsApp आणि Facebook वर शेअर करा.
मराठी कोट्स, प्रेरणादायी स्टेटस, मनोरंजक सामग्री आणि सुविचार यासह मराठी संस्कृतीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी MarathiFirst.com वेबसाइट ला भेट द्या.
Thank You For Reading This Article & Keep Supporting us ! 💖